मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 इतर खेळ

महाराष्ट्र राज्यातील तुळापूर गावामध्ये स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजीराजे यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल बनवले जाणार

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   29-09-2022 08:32:02   240

नवी दिल्ली 23/9/2022

संसद भवन नवी दिल्ली महाराष्ट्र राज्यातील तुळापूर गावामध्ये स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजीराजे यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल बनवले जाणार आहे ह्या कारणाने तसेच महाराष्ट्र राज्या च्या स्कूल गेम्स आणि खेलो इंडिया ह्या हेतूने श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर आणि युवा उद्योजक श्री योगेश भानू से मंत्री महोदय यांना भेटले

मागील तीन वर्षांपासून स्कूल गेम्स बंद आहेत, स्कूल गेम्स मुळे खेळाडू पुढे येतात आणि पुढे जाऊन देशाचे नाव उज्ज्वल करतात प्रत्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसेच ओलंपिक खेळाची सुरुवात स्कूल गेम्स मध्ये होत असते,

इथे लाखो खेळाडू मैदानावर आपले भविष्य उज्वल करतात काही खेळाडू त्या मध्ये यशस्वी होतात तर काही खेळाडूंना शासकीय सेवेत नोकरी मिळते आणि विशेष म्हणजे खेळाडूंना दहावी बारावी परीक्षेत ग्रेस गुण मिळतात आणि आठ हजार पासून बारा हजार रुपये पर्यंत खेळाडूंना शिष्यरुत्ती मिळते तसेच अकरावी मध्ये प्रवेश साठी तीन टक्के आरक्षण मिळते आणि जे खेळाडू पुढे जाऊ शकत नाहीत ते शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्त होतात तसेच खिलाडू वृत्ती बौद्धिक फीट होतात, परंतु कोरोना महामारी मुळे क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत आणि मग खेळाडू विद्यार्थ्यांना मैदानावर आपले कौशल्य दाखवता आले नाही तसेच मुलांचा जेतेपणाचा जोश तसेच प्रभावाचे शल्य काहीच दिसले नाही, आणि मैदानावर गर्दी जमली नव्हती तसेच मुलांचे आवाज देखील ऐकायला मिळते नाहीत आणि मग खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धा सुरू न झाल्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांना मैदाना बाहेर पडावे लागत होते आणि आहे आणि ही गोष्ट क्रीडा तसेच खेळ संस्कृति साठी हानिकारक आहे, आणि मग त्या साठी क्रीडा मंत्र्यांनी स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया त्यांच्या बरोबर समेट करून तसेच शासाना द्वारे कमिटी द्वारा नॅशनल राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लवकरात लवकर सुरू कराव्यात या सर्व गोष्टी मंत्री महोदय यांना निवेदन सादर केले तसेच सांगण्यात आल्या,

महाराष्ट्र राज्या च्या पुणे जिल्हा तील तुळापूर गावामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीचे क्रीडा संकुल बनले पाहिजे त्या साठी राज्याचे शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ राज्य समन्वयक श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर तसेच युवा उद्योजक क्रीडा मंत्री महोदय यांना भेटले केंद्रातील सामाजिक न्याय मंत्री नामदार डॉ रामदास जी आठवले साहेब यांनी धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान भूमीत आंतरराष्ट्रीय तर्जाचे क्रीडा संकुल असावे यासाठी लक्ष देऊ असे आश्वासन दिले राज्याचे शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ राज्य अध्यक्ष श्री राजेंद्र जी कोतकर सर यांनी महाराष्ट्र राज्यातील खेळ व क्रीडा संस्कृती ला प्रोत्साहन मिळाले पाहिजे यासाठी  क्रीडा मंत्री महोदय भारत सरकार यांना निवेदन सादर करावे व महाराष्ट्र राज्यातील विविध क्रीडा समस्या सोडवण्या साठी मंत्री महोदय यांनी प्रयत्न करावेत यासाठी राजेंद्र जी कोतकर सर प्रयत्न करत होते अखेर श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांचे माध्यमातून त्यांचे प्रयत्नांना यश आले,

श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर व श्री योगेश भानू से यांनी क्रीडा मंत्री यांचे सचिव तसेच नामदार श्री अनुराग सिंग ठाकूर साहेब यांचे समवेत महाराष्ट्र राज्यातील क्रीडा समस्या संधर्भात आपले मत प्रभावी पणाने मांडले तसेच त्यांना व सामाजिक न्याय मंत्री महोदय नामदार श्री रामदास जी आठवले साहेब यांना निवेदन सादर केले.

महाराष्ट्र राज्यात खेलो इंडिया शाळांचे रजिस्ट्रेशन सत्तर टक्के झाले आहे शाळांमध्ये सहावी पासून आठवी पर्यंत आठवड्यात चार तासिका तसेच नववी व दहावी साठी तीन तासिका तसेच अकरावी व बारावी साठी दोन तासिका टाईम टेबल मध्ये घेतली आहेत खेलो इंडिया तसेच फिटनेस प्रोग्राम खूप चांगला आहे आणि त्याला आम्ही महाराष्ट्र राज्यात चांगल्या पद्धतीने चालऊ इच्छितो परंतु निर्धारित तासिका मध्ये पाठ्यक्रम तसेच सामान्यांचा सराव सुध्दा होत नाही तर मग खेलो इंडिया ची कसोटी तसेच त्याचे परीक्षण कसे करायला हवे खेलो इंडिया ला तासिका मिळतील तसेच फीट इंडिया चे पंत प्रधनांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल त्या साठी आम्ही महाराष्ट्र राज्या तील सर्व शिक्षक पूर्ण योगदान देणे साठी तय्यार आहोत तरी सुध्दा तुम्ही आमचे म्हणणे ऐकून घ्यावे असे श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांनी क्रीडा मंत्री महोदय यांना सूचक पद्धतीने आपले मत मांडले श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांना आयकॉन्स ऑफ आशिया हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्या हेतूने मंत्री महोदय यांनी मच्छिंद्र ओव्हाळ सर यांचे स्वागत सत्कार केला. श्री अविनाश बलकवडे यांनी श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांचे अभिनंदन केले तसेच राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ राज्य अध्यक्ष श्री राजेंद्र जी कोतकर सर यांनी  श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांचे मनोबल वाढविले , क्रीडा शिक्षक महासंघ चे उपाध्यक्ष राजेंद्र पवार श्री आनंद पवार, राजेंद्र कदम, श्री राजेश जाधव, घनश्याम सानप, कैलास माने, विलास घोगरे, प्रीतम टेकाडे, लक्ष्मण बेल्लाळे, त्यांचे सर्वांचे हस्ताक्षर निवेदन मध्ये होते तुळापूर ग्रामपंचायत सरपंच माननीय सौ गुंफा इंगळे, श्री राजाराम शिवले उपसरपंच, माननीय श्री पवन खैरे, नवनाथ शिवले पूर्व उप सरपंच यांचे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे त्या निवेदनावर हस्त अक्षर होते....


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती