दुखापतीमुळे रोहित शर्माने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती. रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली असून भारतीय संघाच्या नेतृत्वासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर ही धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर आली आहे.सहा फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील एकदिवसीय आणि कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. वेस्ट इंडिज विरोधातील मालिकेत रोहित शर्मा पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. बुधवारी भारतीय संघाची निवड होणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी दुखापतग्रस्त झालेला रोहित शर्मा एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर काम करत होता. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत आहे. पण रोहित शर्माने आज एनसीएमध्ये आपली फिटनेस टेस्ट पास केली आहे. अहमदाबाद आणि कोलकाता येथे होणाऱ्या सामन्यासाठी रोहित उपलब्ध असेल.
नुकतेच या मालिकेचं सुधारित वेळापत्रक बीसीसीआयने जारी केलं आहे.
वेस्ट इंडिजचा भारत दौऱ्याचं सुधारित वेळापत्रक :-
एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता