मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 क्राईम विभाग

बिटकॉईन हडपण्यासाठी पोलीस शिपायासह 8 आरोपी गजाआड

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   02-02-2022 12:50:43   766

                               पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात पोलीस शिपाई दिलीप खंदारेसह ८ आरोपींना गजाआड केलंय. ३०० कोटींचं बिटकॉईन हडपण्यासाठी पोलीस शिपायानंच एकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडलीय..यात पोलिसानं गुन्हेगाराचीच मदत घेतल्याचं तपासात निष्पन्न झालंय. विनय नाईक नावाच्या व्यक्तीकडे ३०० कोटींची बिटकॉइन ही क्रिप्टो करन्सी आहे अशी माहिती विनय खंदारेला मिळाली होती..एका सायबर गुन्ह्याचा तपास करताना त्याला ही माहिती मिळाली होती. त्यानंतर आपण मालामाल होऊ, असं त्याला वाटू लागलं होतं.यासाठी खंदारेनं विनयचं अपहरण करण्याचा कट रचला. पोलीस शिपाई खंदारेनं प्रदीप काटे या ओळखीच्या व्यक्तीशी संपर्क साधला आणि आणखी काही जणांना सोबत घेतलं,त्यानंतर ताथवडे गावातल्या एका हॉटेलमधून विनय नाईकचं अपहरण करण्यात आलं,पोलिसांनी अत्यंत शिताफीनं तपास करत ८ आरोपींना गजाआड केलं.

 बिटकॉईन म्हणजे काय ?

                           बिटकॉईन हे एक आंतरजालीय चलन आहे. या चलनाद्वारे पैसे जगभरात पाठवता येतात. ही एक क्रिप्टॉग्राफी प्रकारातील हॅशींग ही कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे. बिटकॉईन सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त चलन आहे यावर काही लोकांचा विश्वास बसल्याने या चलनाची लोकप्रियता आणि मूल्य वाढते आहे. इ.स. २१४० मध्ये नवीन बिटकॉईन निर्माण होण्याचे थांबणार आहे असे मानले जाते.ऑगस्ट 2013 अखेर जगात बिटकॉईन ने होणाऱ्या व्यवहरांची संख्या 1.5 बिलियन डॉलर गेली होती.हे एक आभासी चलन आहे.अनेक देशात याला कायदेशीर रित्या मान्यता नाही.बिटकॉईन साठवणे अगदी सोपे आहे. बिटकॉइन हे एक डिझीटल आभासी चलन आहे , विकेंद्रित पद्धतीने इंटरनेटचा वापर करून बिटकॉइन व्दारा व्यवहार करता येतात , बिटकॉइनवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही केंद्रीय संस्था नाही , व्यवहारांच्या संख्येवरून लेजर नावाचे यंत्र बिटकॉइनची किंमत , मागणी व पुरवठा ठरविते वस्तु विकणारा आणि घेणारा व्यक्ती व्यवहार करण्यासाठी बिटकॉइन चा वापर करतात म्हणजे वस्तू विकणाराच्या खात्यावर त्या वस्तूच्या किमतीइतके बिटकॉइन पॉईंट्स जमा होतात, हा विक्रेता दुसरी एखादी वस्तु घेणार असेल , तर तो या बिटकॉइन पॉईंट्स मधून खर्च करतो. प्रत्येक देशाची एक करन्सी असते. आपल्या देशाची करन्सी म्हणजेच चलन रुपया आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या देशांच्याही करन्सी असतात आणि ही करन्सी त्या देशातील केंद्रीय बँकेद्वारे रेग्युलेट होत असते. या उलट बिट कॉईन कोणत्याही एका देशाची करन्सी नाही. ही एक डिजीटल करन्सी आहे. ही करन्सी कोणत्या एका देशासाठी नसते. याला क्रिप्टोकरन्सी म्हणतात.

                                   ही क्रिप्टोग्राफीसाठी वापरली जाते. या करन्सीला डिजीटल पद्धतीने बनवण्यात आलेआहे. याच्या माध्यमातून आपण कोणतीही गोष्ट खरेदी करू शकतो. याची ट्रेडिंगही होते. हे विकून पैसेही कमावता येतात. काही देशांनी ह्या संख्यात्मक चलनावर पूर्ण बंदीच आणली आहे, तर काहींनी दुसऱ्या टोकाला जाऊन ह्या व्यवहारांना मान्यता दिली आहे. पण ह्याहूनही मोठी भीती आहे ती गुन्हेगारी जगतात ह्या संख्यात्मक चलनाचा वापर हे चलन कोणाकडे व किती आहे ह्याच्या गुप्ततेमुळे गुन्हेगारी, ड्रग्ज माफिया, आतंकवादी ह्यांना मोठमोठे धन एका देशातून दुसऱ्या देशात पाठवण्यास व त्याचे वाटप करण्यात नक्कीच सुविधा होईल. आज अशा पैशाचे रूपांतर सोने, हिरे किंवा नकद ह्या स्वरूपात असेल, पण संख्यात्मक चलन हे गुणात्मक इतके सरस आहे की कदाचित त्यामुळे भविष्यात सोन्याची मागणी कमी होऊन त्याचे भाव गडगडतील. पण त्याचबरोबर जागतिक पातळीवर भारतासारख्या देशातील उद्योगांना पैसा उभा करायचा असेल तर ह्याच चलनाचे बाँड करून कोणत्याही जाचक अटी-नियमांशिवाय सोपा मार्ग सापडेल. बिटकॉइनची म्हणजेच संख्यात्मक चलनाची ही क्रांती इतर क्रांतींप्रमाणेच दुधारी आहे. शेवटी आपण ती कशी वापरणार ह्याने ते चलन चांगले की वाईट हे समजेल.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती