किर्गिझस्थान ( बिस्केक ) येथे होणाऱ्या १७ वर्षाआतील ग्रीकोरोमन आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत सोहम व सिध्दनाथ करणार भारताचे प्रतिनिधित्व
किर्गिझस्थान ( बिस्केक ) येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड चाचणी खुल्या पद्धतीतीने पतियाळा ( पंजाब ) येथे आज दिनांक १७ मे रोजी आयोजित केली होती .
सदर चाचणी स्पर्धेत संपूर्ण भारतातील अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीरांनी सहभाग घेतला महाराष्ट्रातून अनेक कुमार कुस्तीगीरांनी या चाचणी स्पर्धेत सहभाग घेऊन सोहम मोरे( सातारा ) ७१ किलो वजन गट व सिध्दनाथ पाटिल ( कोल्हापूर ) ४८ किलो वजन गट या दोघांनी हरियाणा , दिल्ली, उत्तर प्रदेश च्या पैलवानांनां अस्मान दाखवून भारतीय स्तरावरील महाराष्ट्राच्या कुस्तीचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला .
सोहम मोरे ( सातारा ) हा कुस्तीगीर रुस्तम- ए - हिंद पै. अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल बुचडे कुस्ती अकादमी पुणे येथे सर्व करतो तसेच सिध्दनाथ पाटिल ( कोल्हापूर ) हा भारतीय सेना ( बॉईज ) ASI पुणे येथे सराव करत आहे .