केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं यासंदर्भात अधीसूचना जारी केली आहे.
4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकीवर बसवायचं असेल तर त्यांना हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट वापरणं अनिवार्य करण्यात आलंय.
मुलं दुचाकीवर बसल्यानंतर दुचाकीचा वेग फक्त 40 किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवावा लागणार आहे.
या नव्या वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास 1 000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तर, चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे.
लहान मुलांचं हेल्मेट कमी वजनाचं आणि वॉटरप्रूफ असावं.