मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 राष्ट्रीय

या बँकांच्या नियमांत होणार बदल

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   01-02-2022 08:48:37   1553

      आज  1 फेब्रुवारी 2022 पासून सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या बँकांचे नियम बदलणार आहेत. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India), बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) आणि पीएनबी बँकेच्या (PNB Bank) व्यवहारांशी संबंधित नियम बदलणार आहेत. या नियमांबद्दल जाणून घेऊया.

        SBI ने दिलेल्या माहितीनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांमध्‍ये मनी ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + GST ​​चार्ज लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे व्यवहारांची रक्कम 2 लाखांवरून 5 लाख रुपये केली. रिझर्व्ह बँकेने IMPS च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली होती. आता 2 लाखांऐवजी तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता.

     


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती