मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 महाराष्ट्र

पहिल्याच 15 वर्षाखालील राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला घवघवीत यश .

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   03-04-2022 14:14:20   595

 

पाटना बिहार येथे पारपडलेल्या पहिल्याच 15 वर्षाखालील राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला घवघवीत यश मिळाले ३ सुवर्ण ,३ कास्य व २ कास्य पदक पटकावून महाराष्ट्राच्या कुमार मुलांनी नवीन इतिहास रचला आहे . 

भारतीय कुस्ती महासंघ आयोजित 15 वर्षाखालील राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक कुमार पैलवानांनी सहभाग घेतला होता . पदक विजेत्या कुस्तीगिरांची नावे खालील प्रमाणे :-

१) ओमकार कराळे 38 किलो , ग्रिको रोमन सुवर्ण पदक ( अमोल बुचडे कुस्ती अकादमी पुणे ) 

२) साईराज वाडकर 38 किलो , रौप्यपदक फ्री स्टाईल ( लोकनेते सदाशिवराव मंडलिक , कुस्ती केंद्र कोल्हापूर ) 

३) यशवर्धन पवार 41 किलो फ्री स्टाईल कास्यपदक ( लोकनेते सदाशिवराव मंडलिक , कुस्ती केंद्र कोल्हापूर ) 

४) ओंकार सुतार 41 किलो ग्रीको रोमन कास्य पदक (सह्यद्री कुस्ती संकुल पुणे ) 

५) सुजित जाधव 44 किलो फ्री स्टाईल कास्य पदक ( सह्यद्री कुस्ती संकुल पुणे ) 

६) सुमित भारस्कर 68किलो फ्रिस्टाईल सुवर्ण पदक ( अमोल बुचडे कुस्ती अकादमी पुणे ) 

७) सोहम मोरे 68 किलो ग्रीको रोमन सुवर्ण पदक ( अमोल बुचडे कुस्ती अकादमी पुणे ) 

८) हर्षद चौधरी 48 किलो ग्रीको रोमन कास्य पदक ( अमोल बुचडे कुस्ती अकादमी पुणे ) 

९ ) यश सरडे 44 ग्रीको रोमन किलो कास्य पदक ( अमोल बुचडे कुस्ती अकादमी पुणे )  

 

 अमोल बुचडे कुस्ती अकादमी पुणे या कुस्ती अकादमी मधील नवोदित कुस्तीगीरांनी या स्पर्धेत ३ सुवर्ण पदक पटकावून अखिल भारतीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उंचावले असून , आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदकाच्या आशा या नवोदित 

 कुस्तीगीरांनी नक्कीच वाढवल्या आहेत .


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती