काल दिनांक 9 मार्च 2022 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशना निमित्त महाराष्ट्र राज्याचे शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ चे राज्य समन्वयक श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांनी महाराष्ट्र राज्या च्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षा ताई गायकवाड यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासंबंधी चर्चा केली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आपली कर्तव्य प्रामाणिक पणे बजावत आहेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समानतेचा हक्क सरकारने उदारीकरणाच्या नावाखाली डावलण्यात आला आहे. लोकशाही मुल्यानुसर जूनी पेन्शन कर्मचाऱ्यांना मिळणे योग्य आहे शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या जागा असताना संच मान्य तेतील बदलत्या निकषानुसार भरती होऊ शकली नाही संच मान्य ते तील मागील शासन निर्णय रद्द करून संच मान्य ते च्या निकषात काळानुरूप बदल करून व नवीन निकषानुसार शाळा तेथे शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणजे अगदी पहिली ते चौथी वर्गासाठी सुद्धा बाय फोकल पद्धतीने नोकर भरती करण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षा ताई गायकवाड यांना निवेदन देण्यात आले,व सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच पवित्र पोर्टल मधे सुद्धा शारीरिक शिक्षण शिक्षक व कला शिक्षक यांचा समावेश करण्यात यावा असे विचार माननीय श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांनी मांडले , तसेच बारावीतील खेळाडूंना क्रीडा ग्रेस गुण मिळणे करिता विशेष बाब म्हणून सवलत गुनांसाठी प्रारिपत्रकात बदल व्हावे यासाठी देखील निवेदन सादर करण्यात आले, तसेच श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांवर महाराष्ट्र राज्या चा महागायक चिरंजीव ऋषी भोसले याने गीत गायले आहे त्याचे प्रसारण शालेय शिक्षण मंत्री महोदय यांचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी श्री श्रीकांत दादा बलकवडे, श्री संतोष सुर्वे चिरंजीव ऋषिकेश भोसले व ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते माननीय श्री रणजित सिंग डीसले सर मान्यवर उपस्थित होते
यासाठी मार्गदर्शन राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री राजेंद्र जी कोतकर सर, माननीय श्री अविनाश भाऊ बलकवडे, श्री आबासाहेब जाधव सर यांनी केले
श्री विलास घोगरे, श्री राजेंद्र पवार श्री आनंद पवार, राजेंद्र कदम श्री राजेश जाधव, श्री घनश्याम सानप, कैलास माने, श्री प्रीतम टेकाडे लक्ष्मण बेल्लाले, सुनील नाईक यांच्या सह्या होत्या