पुणे जिल्ह्यातील पुणे कॅन्टोन्मेंट अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघातून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने यशवंत नडगम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थिती मध्ये यशवंत नडगम यांनी पक्षामध्ये प्रवेश केला व त्यावेळी त्यांना AB फॉर्म देण्यात आला.
नामदेवराव ढसाळ यांनी स्थापन केलेल्या दलित पॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर यशवंत नडगम कार्यरत आहेत.
यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष विनोद साबळे, दिपक केदार, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.