मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांची पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा शंभर एकरात या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. काही वेळातच मराठा आरक्षणासाठी जरांगेची तोफ खेड मध्ये धडधडणार आहे....सभेसाठी आलेल्या मराठा समजाच्यावतीनं छगन भुजबळ आणि नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांची राजगुरुनगर आणि बारामतीत सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पुणे येथील राजगुरुनगरमध्ये आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या सभेसाठी 100 एकर जागा घेण्यात आली आहे. सभेसाठी भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. अत्याधुनिक साऊंड सिस्टिम, ठिकठिकाणी एलईडी स्किन, जनरेटरची व्यवस्था असे मोठे नियोजन सभेसाठी करण्यात आले आहे. तीन जनरेटरच्या माध्यमातून सभास्थळी विद्युत पुरवठा केला जात आहे. या ठिकाणी इंटरनेटची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या नवरात्र उत्सव सुरु आहे. त्यासाठी मंडपाला मोठी मागणी आहे. परंतु वैभव कोतवाल यांनी सभेसाठी विनामूल्य मंडप उपलब्ध करुन दिले आहे. सभास्थळी येणाऱ्या मराठा बांधवांसाठी नाश्ता, पाण्याचे नियोजन केले आहे. यासाठी दानशूर व्यक्तींकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे सर्वांना मोफत नाश्ता, पाणी मिळणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून सराकारला अल्टीमेटम दिला होता. आता मराठा आरक्षणासाठी फक्त चार दिवसांचा कालावधी राहिला आहे. यामुळे पुणे येथील सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे.