मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 मुंबई शहर

मी पळालो नाही तर मला पळवलं

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   18-10-2023 23:08:53   895

                                2 ऑक्टोबर 2023 ला ड्रग्ज माफिया ललित पाटील पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता. तेव्हापासून त्याचा कसून शोध घेतला जात होता. याचप्रकरणात पुणे पोलिसांनी आधी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला उत्तर प्रदेशातून अटक केली होती.ललित पाटील पुण्यातून, गुजरात, त्यानंतर कर्नाटकला गेला. कर्नाटकातून तो गुजरातला गेला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून ललित पाटीलची माहिती मिळाली होती . 

                           ललित पाटीलला अखेर बंगळुरुतून अटक करण्यात आली आहे.  मुंबई पोलीस  त्याला मुंबईत घेऊन आले. वैद्यकीय तपासणीनतंर त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं असून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्या आली आहे.

                               ललित पाटलने  धक्कादायक दावा केला आहे कि ,  मी पळालो नाही तर मला पोलिसांनी पळवलं, असं ललित पाटील याने म्टलं आहे. यामागे कुणाकुणाचे हात आहे, हे सर्व मी उघड करणार . पोलिसांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचंही ललित पाटील याने सांगितले.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती