*कोंढार चिंचोली येथे युवा नेते श्री अभिजीत साळुंखे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न .
आज लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान कों. चिंचोली च्या वतीने कोंढार चिंचोलीचे प्रगतशील बागायतदार, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे करमाळा तालुका कार्याध्यक्ष, युवा नेते माननीय श्री अभिजीत साळुंखे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रतिष्ठानच्यावतीने त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला, व त्यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली, त्याप्रसंगी श्री गजाननाची आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष- मनोहर लांडगे, जयंती उत्सव समिती- 2023 चे अध्यक्ष -श्री भरत (अण्णा )लांडगे, उपाध्यक्ष- श्री मनोज कांबळे, सचिव- राहुल कांबळे, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक -श्री संदीप कुचेकर सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कोंढार चिंचोली ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री नवनाथ साळुंखे,श्री गणेश धांडे, श्री रवींद्र खांडेकर,माजी सरपंच सुरेश साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संजय लांडगे,श्री दशरथ लांडगे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राहुल गलांडे, श्री श्याम गोडगे, चेतन साळुंके, औदुंबर साळुंके, वरून कांबळे, निखिल कांबळे, अभिषेक लांडगे, पंकज लांडगे,अतुल धांडे, यांच्यासह लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे सर्व सदस्य व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.