मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 सोलापूर

*कोंढार चिंचोली येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाने दिमाखात साजरी*

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   01-08-2023 21:37:42   437

*कोंढार  चिंचोली येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाने दिमाखात साजरी* *

आज दिनांक 1/8/ 2023 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त कोंढार  चिंचोली तालुका- करमाळा येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान को.चिंचोली यांच्या वतीने जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  करमाळा तालुक्याचे युवा नेते माननीय श्री दिग्विजय भैया बागल, बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष माननीय श्री सुभाष आबा गुळवे, पश्चिम भागाचे युवा नेते व ज्येष्ठविधीज्ञ माननीय श्री नितीनराजे राजेभोसले, दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक -            रामदासजी झोळ सर, प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष कुंभार साहेब, जागतिक आरोग्य सल्लागार गोकुळ सर जायभाय, मार्केट कमिटीचे माजी संचालक नागनाथ लकडे, कोंढार चिंचोली चे सरपंच शरद भोसले उपस्थित होते. तसेच विशेष उपस्थिती म्हणून श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री आशिष भैया गायकवाड, श्री रामभाऊ हाके, अजित बप्पा झांजुर्णे, आरटीआय कार्यकर्ते व चिंचोलीचे माजी सरपंच देविदास आप्पा साळुंखे, मकाई चे मा. संचालक नंदकुमार भोसले, आदिनाथ चे माजी संचालक श्री राजेंद्र धांडे, श्री किरणजी कवडे, सरपंच डॉ गुळवे, मा सरपंच सुरेश साळुंखे, अण्णासो       गलांडे, दिलीप गलांडे, सुहास गलांडे, संजय साळुंखे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष निळकंठ शिंदे, लोकवार्ता चे पत्रकार श्री विजयकुमार गायकवाड, उजनी एक्सप्रेस चे संपादक  श्री अमोल कांबळे, पद्मावती डेअरीचे चेअरमन माननीय श्री हनुमंत गलांडे, ॲक्सिस बँक मॅनेजर श्री महेश खांडेकर,युवा नेते अभिजीत साळुंखे, साकेत धांडे (ज्ञानाई कंट्रक्शन) रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल गलांडे, माजी उप सरपंच अशोक राऊत ग्रामपंचायत कोंढार चिंचोली चे सर्व विद्यमान  सदस्य ग्रामसेवकश्री बोराडे  उपस्थित होते. तरी जयंती कार्यक्रमात प्रथमता प्रतिमा पूजन,व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, व नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढार चिंचोली येथील विविध बौद्धिक स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले, तसेच समाजसेवेच्या अनमोल कार्याबद्दल सेवा करणाऱ्या मान्यवरांचा जयंती उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जयंती उत्सव समितीच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार श्री विजयकुमार भगवान गायकवाड यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला, याच्यानंतर रक्तदान शिबिराचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले व व वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला, तसेच या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केल अशा प्रकारे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम घेऊन जयंती साजरी करण्यात आली . या जयंती कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष -श्री मनोहर भाऊ लांडगे,जयंती अध्यक्ष -श्री भरत लांडगे, उपाध्यक्ष श्री मनोहर कांबळे, खजिनदार -काकासाहेब लांडगे, व मार्गदर्शक- संदीप कुचेकर, संजय लांडगे, सुरेश लांडगे, यांच्यावतीने करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एड प्रथमेश शिंदे व लहू कन्या सौ सोनाली पवार -लांडगे यांनी केले. व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते*


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती