आज छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील औंध गाव येथील नागरिकांना मा. खासदार श्री. संजय नाना काकडे निर्मित 'मोदी@9' ही पुस्तिका भेट देण्यात आली.
आपले लाडके पंतप्रधान मा. मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात राबविलेल्या महत्वपूर्ण योजनांची माहिती या पुस्तिकेत दिलेली आहे. तसेच मतदारसंघात फिरताना नागरिकांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल विशेष आपुलकी व प्रचंड विश्वास आहे असे नागरिक स्वतः पुढे येऊन सांगत आहेत, यावेळी भाजपा चा एक छोटा कार्यकर्ता म्हणून खूप अभिमान व आनंद वाटतो. ही पुस्तिका पुणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १० हजार प्रमाणे एकूण ६० हजार प्रतींचे आम्ही वाटप करीत आहोत. - मा.सिध्दार्थ शितोळे
यावेळी मा. खासदार श्री. संजय नाना काकडे, मा.सिध्दार्थ शितोळे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. गणेश बगाडे, मा. सुनील पांडे, मा. प्रकाशभाऊ ढोरे, मा. सनीदादा निम्हण, मा. राहुल भंडारे, मा. सचिन वाडेकर, मा. रोहन खोमणे, मा. बाळासाहेब रानवडे, मा. सचिन मानवतकर, मा. समाधान शिंदे, मा. सौरभ कुंडलिक, मा. ओमकार कदम, मा. राजेश नायडू, मा. प्रकाश सोलंकी, मा. बाळासाहेब दारवटकर, मा. सुप्रीम चोंधे तसेच भाजपा छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.