मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 पुणे शहर

भांडारकर रोडवर धरणे आंदोलन केले.

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   23-06-2023 22:59:55   1048

          आज भांडारकर रोड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने मा. सुनील पांडे जी, मा. गणेश बगाडे जी, मा. अपूर्व खाडे जी, मा. अपूर्व सोनटक्के जी, मा. अभिजीत मोडक जी आणि इतर कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे  महानगरपालिकेने केलेल्या निकृष्ट ड्रेनेजच्या कामाबद्दल आपला असंतोष आणि संताप व्यक्त करण्यासाठी भांडारकर रोडवर धरणे आंदोलन केले.

           याठिकाणी नव्याने बसवण्यात आलेले ड्रेनेजवरील मॅनहोल कव्हर्स अगोदरच खराब झाले आहेत, त्यामुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला होता. या धरणे आंदोलनाची माहिती मिळाल्यावर, सिद्धार्थ शिरोळे ताबडतोब त्याठिकाणी पोहोचले आणि निकृष्ट कामाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुणे मनपा पथ विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधला व  खराब झालेले मॅनहोल कव्हर्स बदलून घेतले. संबंधित अधिकार्‍यांना रहिवाशांच्या सुरक्षिततेला आणि सुविधेला प्राधान्य देऊन, रस्त्यावर नव्याने बसवलेले सर्व ड्रेनेज चेंबर्सवरील मॅनहोल कव्हर्स त्वरीत बदलण्याचे निर्देश यावेळी दिले. 

          यावेळी मा.सिद्धार्थ शिरोळे ,मा. सुनील पांडे, मा. गणेश बगाडे, मा. अपूर्व खाडे, मा. अपूर्व सोनटक्के, मा. अभिजीत मोडक, मा. शाम आप्पा सातपुते, मा. अपर्णाताई कुऱ्हाडे, मा. निलेश घोडके, मा. सुजित गोटेकर, मा. राजेश नायडू, मा. योगेश जोगळेकर, मा. हार्डीकर तसेच भाजपा छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती