दि. ९ जून रोजी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि म्हाडा आणि सिडको अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकी मध्ये डबेवाल्यांच्या अतिमहत्त्वाच्या घरांच्या गेली कित्तेक वर्षे प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांनी डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न येत्या काही दिवसातच सुटेल अशी आशा आम्हा डबेवाल्यांना दिली. मा. श्री श्रीकांत भारती, आमदार,विधानपरिषद यांच्या पाठपुराव्यामुळे डबेवाल्यांच्या प्रश्न पहिल्यांदाच अधिवेशनात मांडण्यात आला होता.
यावर सकारात्मक प्रतिसाद देत फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये तात्काळ जलद कार्यवाही करण्याचे निर्देश फडणवीस साहेबांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत डबेवाले संघटनेचे अध्यक्ष श्री. उल्हास मुके, श्री. रामदास करवंदे, उपाध्यक्ष- श्री. चिंतामण बच्चे , सल्लागार श्री. रमेश मोरे आणि सौ. अमृता गुरव हे डबेवाल्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तिन्हीही रेल्वे मार्गांवर कार्यरत असलेल्या डबेवाले कामगार वर्गाला त्यांच्या उत्पन्नाला अनुरूप किंमतीत घरे उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे धोरण असून लवकरच या बाबीच्या पूर्तता करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने जाहीर करण्यात आले . या सुखद बातमीमुळे डबेवाले कामगार वर्गाने आनंद व्यक्त करून इतक्या वर्षाच्या मागणी ची पूर्तता होताना राज्य सरकारच्या या निर्णयाचे आम्ही मनस्वी स्वागत करत आहोत असे मत डबेवाल्यांचे मुख्य प्रवक्ते विष्णू काळडोके यांनी मांडले.