मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 पुणे ग्रामीण

सेवा निवृत्त शिक्षक बांधव यांना अनुदान ताबडतोब देऊ पे युनिट अधिकारी माननीय श्री अनिल फुंदे यांची ग्वाही.

युवराज कसबे (पुणे जिल्हा प्रतिनिधी)   07-06-2023 22:55:27   776

सेवा निवृत्त शिक्षक बांधव यांना अनुदान ताबडतोब देऊ पे युनिट अधिकारी माननीय श्री अनिल फुंदे यांची ग्वाही.

काल सायंकाळी सेवा निवृत्त शिक्षक मा श्री तांबे सर यांनी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ भारत भूषण डॉ मच्छिंद्र ओव्हाळ सर यांना फोन करून वेतन आयोगाचे हप्ते शासन तिसरा व चौथा देयच्या तयारीत आहेत परंतु पे युनिट ने अजुनही सेवा निवृत्त शिक्षक बांधव यांना पहिला हप्ता दिला नाही गेली दोन वर्षे सेवा निवृत्त शिक्षक त्याचा पाठ पुरावा करत होते पे युनिट च्या अधिकाऱ्यांकडून उत्तर होते अजून अनुदान आले नाही आणि आले की देऊ ही अनपेक्षित उत्तरे होती काही सेवा निवृत्त शिक्षक बांधव यांना अनुदान व काही सेवा निवृत्त शिक्षक बांधव यांना नाही हा प्रकार श्री तांबे सर यांनी डॉ मच्छिंद्र ओव्हाळ सर यांचे कानी घातला श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांनी ताबडतोब अंमल बजावणी करून पे युनिट पुणे चे अधिकारी माननीय श्री अनिल फुंदे यांची भेट घेतली व सेवा निवृत्त शिक्षक बांधव यांचा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली व मा श्री अनिल फुंदे यांनी ताबडतोब  अधिकारी यांचे समवेत चर्चा करून निर्णय घेतला येत्या 30 जून पर्यंत अनुदान सेवा निवृत्त शिक्षक बांधव यांचे खात्यावर जमा करू अशी ग्वाही दिली.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती