आंबेगाव तालुक्यांतील जुन २०२० साली निसर्ग चक्रीवादळामुळे हिरडा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. किसान सभेच्या मागणी वरुन सरकारने या नुकसानीचे पंचनामे त्या वेळी केले होते. परंतु या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासन तयार नव्हते. तीन वर्षे किसान सभा सातत्याने नुकसान भरपाई मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते.
लाल वादळाच्या मोर्चापुढे आज अखेर शासन नमले. आणि तीन वर्षानंतर अखेर हिरड्याच्या नुकसानीचे १५ कोटी रुपये ४००० शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री मा. विजयकुमार गावित साहेबांनी लाल वादळाच्या मोर्चापुढे केली.
हे एक मोठे ऐतिहासीक यश किसान सभेच्या लढ्यामुळे हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले आहे.
किसान सभेच्या मागण्या कोणत्या होत्या ?
1.आदिवासींचे महत्वाचे नगदी पिक असलेल्या बाळहिरडयाची खरेदी शासनाने सुरु करावी.
2.बाळहिरड्याला प्रतिकिलो किमान २५० रुपये हमीभाव द्या.
3.जुन्नर येथील, सहकारी हिरडा कारखान्याला पुरेसे सरकारी अर्थसहाय्य द्या.
4.हिरडा, आंबा, जांभूळ, साग इ. झाडांची शेतकऱ्यांच्या,सात- बाऱ्यावर नोंद करा.
5.नैसर्गिक आपत्तीत या झाडांच्या किंवा फळांच्या होणाऱ्या नुकसानीस,शेतकऱ्यांना इतर पिकांप्रमाणे अर्थसहाय्य द्या.
6.पुणे जिल्ह्यातील, आंबेगाव व जुन्नर तालुक्यात, ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे,
हिरडा फळाचे मोठे नुकसान झाले होते. आंबेगाव तालुक्यात सुमारे ३१९८ शेतकऱ्यांचे तर जुन्नर तालुक्यामध्ये सुमारे ७०५ शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामे झाले होते. किसान सभेच्या लॉंगमार्चमध्ये मान्य केल्याप्रमाणे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची रक्कम त्वरित द्यावी आशा विविध मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला होता .