मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 ठाणे

ठाणे जिल्हा वरिष्ठ महिला निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2023 संपन्न.

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   19-03-2023 20:47:35   788

 

                           24 व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महिला गट कुस्ती आणि  पहिली महिला केसरी कुस्ती स्पर्धा 23 मार्च 24 मार्च 2023 रोजी सांगली येथे संपन्न होत आहेत या स्पर्धेत ठाणे जिल्हा तालीम संघाचा महिला संघ सहभागी होणार  जिल्हा निवड चाचणी स्पर्धा रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी कलानिकेतन व्यायाम शाळा कोन तालुका भिवंडी येथे आयोजित करण्यात आली.

              स्पर्धेचे उदघाटन ठाणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष तथा खजिनदार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद,कोनगावचे उपसरपंच श्री.गंगाराम दुंदा पाटील,पै.कृष्णा बुवा मढवी,कलानिकेतन मंडळाचे अध्यक्ष डॉ.विनोद हनुमान पाटील,कोनकर,आंतरराष्ट्रीय पंच विकास पाटील,राष्ट्रीय पंच,मार्गदर्शक प्रा.श्रीराम पाटील, सतिश म्हात्रे,युवराज पाटील,विष्णू पाटील,जयनाथ पाटील,नरेंद्र पाटील,राजेश कराळे,पंकज कराळे, राजेंद्र पाटील,पै.लक्ष्मण कराळे,महेंद्र जाधव,मा.उपसरपंच पांडुरंग कराळे,भरत जाधव,अशोक म्हात्रे आदी मान्यवरांच्या हस्ते वजन काटा पुजन,बक्षिस समारंभ करण्यात आले.

निवड झालेला वरिष्ठ महिला कुस्ती संघ ठाणे जिल्हा तालीम संघ पुढीलप्रमाणे

१) पै.मनिषा संतोष शेलार  भाईंदर-50 किलो प्रथम क्रमांक

२) पै.हर्षली नंदू चौधरी - चौधरपाडा 53 किलो प्रथम क्रमांक

३) पै.ऐश्वर्या भगवान सणस  भाईंदर -55 किलो प्रथम क्रमांक

४) पै.वेदिका सुनिल पाटील - सोनाळे 57 किलो प्रथम क्रमांक

५) पै.लतिका भागवत पाटील - भादवड 62 किलो प्रथम क्रमांक

६) पै.गौरी चंद्रकांत जाधव - दुगाड फाटा ६८ किलो प्रथम क्रमांक

७) पै.अनुष्का नारायण टेमघरे  भादवड- 72 किलो प्रथम क्रमांक 

८) पै. प्रसिद्धी विनोद पाटील कोनगांव  76 किलो प्रथम क्रमांक

सांगली येथे होणाऱ्या 24 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्धा आणि पहिली महिला केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व महिला कुस्तीगीर यांना मान्यवर यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती