मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 मुंबई शहर

जागतिक महिला दिनानिमित्त ‘जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तुत्वाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   08-03-2023 21:35:55   699

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राज्य  आयोगाकडून ‘जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तुत्वाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर, वांद्रे पश्चिम येथे करण्यात आले होते. 

 

यावेळी निवृत्त न्यायमुर्ती साधना जाधव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता हरीश पाठक, विशेष पोलिस महासंचालक दिपक पांडे, आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते, ॲड. संगीता चव्हाण, आभा पांडे, दिपीका चव्हाण, सदस्य सचिव श्रद्धा जोशी, दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख शीला साईल आदी मान्यवर उपस्थित होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दुरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.

 

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समिती करिता मार्गदर्शक तत्वे (SOP) याचे अनावरण यावेळी करण्यात आले.

 

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. डिजीटल माध्यमाचा प्रभावी उपयोग करत कोरोना काळात आपला उद्योग विस्तार करणाऱ्या ‘पाटील काकी’ च्या संस्थापिका गीता पाटील, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव, अर्जुन पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय धावपटू आणि सातारच्या उपजिल्हाधिकारी ललिता बाबर – भोसले, माउली सेवा प्रतिष्ठानद्वारे पिडित महिला-मुलांचे पुनर्वसन करणार्या डॉ. सुचिता धामणे, अंध्यत्वावर मात करत विविध वाद्यांत निपुण संगीत शिक्षिका योगिता तांबे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महिला सरपंच शेख मन्नाबी मुझफ्फर पटेल, गोगलवाडी ग्रामपंचायत, माता बालकांना सुदृढ ठेवण्यात अग्रेसर पाच अंगणवाडी सेविका यांचा सन्मान आदरणीय खासदार शरद पवारसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला. आयोग कार्यालयात २९ वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचारी मानसी जोशी यांचा ही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती