राष्ट्रसेवा समूह व राजमाता जिजाऊ महिला महासंघाच्या माध्यमातून धायरी या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यावेळी राष्ट्रसेवा समूहाच्या शिवदिनदर्शिकेचे प्रकाशन व मोगल जाधव सर लिखित वीर माता जिजाऊ जिजाऊ मासाहेब या पुस्तकाचे प्रकाशन, ग्रीन पॉवर एनर्जी या संस्थेच्या टी-शर्ट चे अनावरण महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
"शहाजीराजे भोसले हे स्वराज्य संकल्पक,राजमाता जिजाऊ स्वराज्यप्रेरिका,छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापक तर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षकच असे प्रतिपादन राहुल पोकळे यांनी केले." तर "जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी आता सावध राहिले पाहिजे, अन्यथा आपल्याच इतिहासाचं विकृतीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. आपणच आपल्या महामानवांच्या स्वाभिमानासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे व जागरूक राहिले पाहिजे" असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी केले.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला महासंघाचे अध्यक्षा स्मिता पोकळे यांनी प्रास्ताविक केले.मोगल जाधव सर यांनी जिजाऊंचा इतिहास थोडक्यात सर्वांना समजावून सांगितला. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब जोरे व राष्ट्रसेवा समूहाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच महिला उपस्थित होत्या.
नवनाथ रायकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार किरण थोपटे यांनी मानले.