काल राज्याची क्रीडा शिक्षक महासंघ राज्य समन्वयक समिती शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य राज्य समन्वयक श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर तसेच अमरावती क्रीडा शिक्षक महासंघ राज्य सह सचिव श्री शिवदत्त ढवळे, मुळशी तालुका शारीरिक शिक्षण महासंघ चे श्री सुनील सातव यांनी राज्यातील खेळाडू विद्यार्थ्यां चे होणारे शैक्षणिक नुसकान टाळण्यासाठी तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा लवकर सुरू कराव्यात यासाठी समन्वय समिती ने आयुक्त साहेब यांचे समवेत आपले मत मांडले. कोरोना महामारी नंतर शाळा पुनः सुरू झाल्या परंतु अजूनही क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या नाहीत. गेल्या वर्षी राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांचे प्रयत्नां मुळे राज्याच्या तत्कालीन शिक्षण मंत्री महोदय वर्षा ताई गायकवाड यांनी दहावी विद्यार्थ्यांना सहभागाची अट शिथिल करून क्रीडा ग्रेस गुण दिले होते. परंतु बारावी खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा ग्रेस गुण मिळाले नाही व त्या मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले पण चालू शक्षणिक वर्षा मध्ये लवकरात लवकर क्रीडा स्पर्धा सुरू कराव्यात अशी मागणी राज्याचे क्रीडा शिक्षक महासंघ अध्यक्ष श्री राजेंद्र जी कोतकर सर, श्री मच्छिंद्र ओव्हाळ श्री शिवद्दत्त ढवळे व श्री सुनील सातव यांनी केली. क्रीडा आयुक्त डॉ सुहास दीवसे साहेब यांनी तसे आश्वासन दिले आहे प्रसंगी आयुक्त डॉ सुहास दिवसे साहेब यांचा सत्कार करण्यात आला तसेच शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ राज्य समन्वयक श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांची निवड आयकॉन ऑफ आशिया पुरस्कारासाठी झाल्या बद्दल त्यांचा राज्य आयुक्त यांचे हस्ते पुष्प गुच्छ देऊन गौरविण्यात आले प्रसंगी उपसंचालक महाराष्ट्र राज्य श्री अनिल चोरमले साहेब, उपसंचालक नागपूर श्री शेखर पाटील साहेब उपसंचालक श्री सुहास पाटील मान्यवर उपस्थित होते.