मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 जालना

महाराष्ट्रामध्ये जनावरांच्या मोफत तपासण्या करून,मोफत लसीकरण मोहीम राबवावी-हर्षल फदाट (बापू)*ना.राधाकृष्ण विखे पाटील

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   16-09-2022 20:30:48   807

 

     राज्यात सध्या धुमाकूळ घातलेल्या लम्पी स्किन आजाराने आता सर्वच जिल्ह्यात शिरकाव केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात गाई, बैल यासारख्या पाळीव प्राण्यांमध्ये लम्पी स्कीन या रोगाची साथ आल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये लसांचा साठा उपलब्ध करून, मोफत लसीकरण मोहीम राबवावी अशी मागणी हर्षल पाटील फदाट यांनी राधाकृष्ण विखे पाटील  पशुसंवर्धन मंत्री यांच्याकडे तहसील कार्यालय जाफ्राबाद यांच्या मार्फत निवेदन सादर केले आहे.

   लॉकडाऊनमुळे प्रचंड नुकसान शेतकरी वर्गाचे झाले. तर कधी कमी पाऊस, कधी जास्त पाऊस तर कधी दुष्काळ,तर कधी अतिवृष्टी तर अशा अनेक संकटांचा सामना शेतकरी नेहमी करत असतो खरीप हंगामाची पेरणी शेतकऱ्यांनी  उसनवारी केली. पण आता लम्पी स्किन आजार निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

  प्रत्येक जिल्ह्यात गाई,म्हशी,आणि बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे जनावरांच्या किंमती प्रचंड वाढलेल्या असताना शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जवळपास शेतकऱ्यांकडे लाखो रुपयांचे जनावरे आहेत.त्यामुळे लम्पी आजाराला आवर घालण्यासाठी मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी हर्षल पाटील फदाट यांनी राधाकृष्ण विखे पाटील (पशुसंवर्धन मंत्री)  यांच्याकडे केली आहे.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती