राजगुरूनगर येथील विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथे सुवर्णमहोत्सवी वर्ष निमित्त केंद्रीय आदिवासी मंत्री रेणुका जी सिंह यांनी सदिच्छा भेट दिली . कार्यक्रम ची सुरुवात मान्यवर चे औक्षण व वसतिगृह तील मुलांनी त्रिवार ओंकार घेऊन केली .
खेड तालुक्यातील या वसतिगृहास ५० वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्ताने सुवर्णमहोत्सवी बोध चिन्ह चे अनावरण त्यांचे हस्ते करण्यात आले . यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवर व वसतिगृह विद्यार्थी यांना त्यांचे राजकीय व सामाजिक कार्य बद्दल माहिती देऊन त्यांनी जनजाती समाजासाठी केलेल्या कार्यबद्दल ची माहिती देऊन प्रत्येक व्यक्ती ने स्वतः चे कुटुंब सोबत देशसेवा करण्याचे आवाहन केले .ह्यावेळी उपस्थित असणारे पद्मश्री गिरीश जी प्रभुणे यांनी हि जनजाती समाजाची सद्यपरिस्थिती ची माहिती देऊन त्यासाठी भरीव काम करण्याचे आवश्यकता असल्याचे नमूद केले .
यावेळी केंद्रीय मंत्री श्रीमती रेणुकाजी सिंह यांचा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेले "जगद्गुरू संत तुकाराम महाराज" यांचे शिल्प देऊन मंत्री महोदय यांचा सन्मान विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री संजय मुरदाले यांनी केला. यावेळी मा.आ. महेश दादा लांडगे, पदमश्री गिरीशजी प्रभुणे , ॲड.सतीश गोरडे , धनाजी शिंदे , ॲड.मुर्णालिनी ताई पडवळ , दिलीप राव देशपांडे , नितीन वाटकर , संदेश भेगडे , गणेश मांजरे ,संतोष खामकर , नानासाहेब सावंत , ॲड. निलेश आंधळे , गणेश रौधल , हेमंत लोखंडे , अक्षय जगदाळे ,अक्षय पऱ्हाड , योगिराज करवंदे ,सिद्धेश गायकवाड , अक्षय लोहकरे,प्रशांत यादव , शिवराम गवली , यांच्यासह विश्व हिंदू परिषद , भारतीय जनता पक्ष चे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम चे नियोजन वसतिगृह अधिक्षक अमोल डमरे यांनी केले .