श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक योगदान पाहता राष्ट्रवादी काँगेस पार्टी पुणे शहर यांचे वतीने त्यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. पुणे शहर मधील शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात अत्यंत अलौकिक कार्य करणाऱ्या शिक्षक बांधव भगिनी यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांना नुकताच आयकॉन्स ऑफ आशिया तसेच बँकॉक येथे होणाऱ्या आशियायी पुरस्कार सोहळा साठी भारत देशातून निमंत्रण देण्यात आले आहे त्या अनुषंगाने पुणे शहर राष्ट्रवादी काँगेस पार्टी चे अध्यक्ष माननीय श्री प्रशांत दादा जगताप, खासदार वंदना ताई चव्हाण, माननीय नगरसेविका सौ नंदा ताई लोणकर व श्री नारायण लोणकर माननीय यांच्या उपस्थितीत श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांना शाल श्रीफळ तसेच ट्रॉफी व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले.
नुकताच त्यांना लोकमत वर्तमान पत्र समूह यांचा अलौकिक व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन केले जात आहे. ते राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ राज्य समन्वयक म्हणून काम पाहतात व जय शिवराय प्रतिष्ठान संचालित न्यू इंग्लिश स्कूल माण विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्य करत आहेत त्यांना नुकताच पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या ही पुरस्कार जाहीर झाला आहे...