मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 मुंबई शहर

७५ व्या स्वातंत्रदिनानिमित्त अंधेरी येथे तिरंगा रॅलीचे आयोजन.

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   13-08-2022 21:37:23   773

 

    ७५ व्या स्वातंत्रदिनानिमित्त अंधेरी येथे मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हासभाऊ मुके यांच्या अध्यक्षतेखाली डबेवाल्यांनी  ध्वज रॅलीचे आयोजन केले.

   भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण होत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारताला केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे.

     डबेवाल्यांच्या कार्याची दखल आज संपूर्ण जग घेत आहे. यातच आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांसाठी या अमृतमहोत्सवी अंधेरी येथे २०० पेक्षा जास्त डबेवाल्यांनी एकत्र येऊन तिरंगा रॅलीचे आयोजन केले व स्वतंत्र भारताच्या घोषणा देत अमृतमहोत्सव साजरा केला.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती