मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 खेड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर २ व १ च्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   06-08-2022 20:15:23   804

 

      जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर २ व १ च्या मुलामुलीने, "हर घर तिरंगा", घरोघरी तिरंगा" अभियानात नागरिकांनी सामील होणेबाबत जनजागृती प्रभातफेरी चाकण शहरांत काढली.

          घरोघरी तिरंगा अभियानामार्फत भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आँफिशिअल टविटर अकाऊंट वरून सर्व भारत वासियांना असे आवाहन केले आहे की भारत देशातील प्रत्येक घराघरात भारताचे राष्टध्वज तिरंगा फडकविण्यात यावा.या अभियानात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन जनतेला केले आहे.

कारण ह्या वर्षी आपला देश स्वतंत्र होण्यास तब्बल 75 वर्ष पुर्ण होणार आहेत.म्हणुन हा 75 वा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे.

   चाकण नंबर २ शाळेच्या मुख्याध्यापिका कमलताई खेडकर मॅडम, चाकण नंबर १ शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता तितर मॅडम यांच्या नियोजनाने "हर घर तिरंगा", घरोघरी तिरंगा" अभियानात नागरिकांनी सामील होऊन 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान आपल्या निवासस्थानावर तिरंगा झेंडा डोलाने फडकवण्याचे आवाहन केले.l


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती