चाकण:- दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत (Day - Nulm).
चाकण नगरपरिषद च्या वतीने शहरातील युवक- युवतींसाठी उद्योग कर्ज मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
मेळाव्यात प्रत्यक्ष मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम विषयी मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच ज्यांचे सर्व कागदपत्रे व प्रकल्प अहवाल तयार आहेत त्यांचे ऑनलाईन अर्ज पोर्टलवर भरण्यात येणार आहेत.
मेळावा :
शुक्रवार दिनांक - 5 आँगस्ट 2022
वेळ - सकाळी 11.00 ते दुपारी 1.30
स्थळ : मिरा मंगल कार्यालय, चाकण, ता.खेड, जि.पुणे
चाकण शहरातील सर्व 18 ते 45 वयोगटातील इच्छुक नागरिकांनी कागदपत्रांसह मेळाव्यात हजर राहावे.
ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित कागदपत्र :1)पासपोर्ट साइज फोटो
2) आधार कार्ड
3) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला /डोमिसीयल सर्टिफिकेट
4) शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी ,12वी, पदवीचे गुणपत्रक )
5)हमीपत्र ,वेबसाईटवरिल मेनूमध्ये मिळेल (Undertaking Form )
6)प्रकल्प अहवाल
7) जातीचे प्रमाणपत्र ( अ जा /अ ज असेल तर )
8) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( उदा. माजी सैनिक, अपंग )