ऐरोस्केटोबॉल असोशिएशन महाराष्ट्र व ऐरोस्केटोबॉल असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व ऐरोस्केटोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने आयोजित कॅडेट व ज्यूनियर गट, दि. ६ ते ९ मे २०२२ आत्मा मालिक स्कुल, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र येथे आयोजित केलेल्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित सी.बी.एस.सी. स्कूलचे प्राचार्य श्री. आशिष काटे, स्टेट बोर्डेचे प्राचार्य श्री. कैलास थोरात, मॅनेजर श्री. महेश रत्नपारखी, पेâडरेशनचे डायरेक्टर श्री. सुनील कॉड्रस, पंच प्रमुख अॅलेक्स शेट्टी, श्याम सुंदर चौधरी, डॅनीयल पेरंबुली व फाऊंडर पागावाड होते.
ऐरोस्केटोबॉल हा खेळ बॉल हवेन उडवत जाऊन स्केटिंग करत ऐसे प्रेâम मध्ये थ्रो करणे अश्या प्रकारे खेळला जातो. हा खेळ कोणत्याही इतर खेळाशी मिळता जोळता नसल्यामुळे खेळांडूना खेळण्यास आनंद भेटतो. ह्या खेळाची स्थापना २०१६ मध्ये झाली. असून हा खेळ तमिलनाडू, तेलंगाना, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, विहार ह्या राज्यात खेळला खातो.
आज झालेल्या कॅडेट गटातील तमिलनाडू विरुद्ध महाराष्ट्र ह्या सामान्यात तमिळनाडू संघाने महाराष्ट्रावर १४ गुणांनी विजय मिळविला. तामिलनाडूकडून अशवंत के, सभरी, वरुण आर.के.जी.जी दारतीन, संजय रंजन व महाराष्ट्रकडून साईराज रेवगडे, कार्तिक आहेर, सिद्धांत बत्रा ह्यांनी आपल्या खेळाचे चांगले प्रदर्शन केले.
कॅडेट गटात झालेल्या तेलंगाणा विरुद्ध तामिलनाडू ह्या सामन्यात तेलगाणा ४ गुणांनी विजयी झाला. तेलंगाणा कडून वेंक्यटराम चरित, यशवंत सरीकोंडा, साई कुमार नरसिम्मा, हरसित, श्रीकांत, कौशिक पवनकुमान, प्रणव श्रीनिवास व तमिलनाडू कडून संजय रंजन, के.जी. दारवीन यांनी चांगली लढत दिली.
ज्यूनियर गटात राजस्थान विरुद्ध महाराष्ट्र सामन्यात राजस्थान ५ गुणांनी विजयी झाला. राजस्थान कडून क्षितिज जैसवाल, ध्रुव सैनी, तनिष सैनी, चंद्रशेखर, उदित भारद्वाज यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले आणि महाराष्ट्र कडून नयन देसाई, तनमय लवटे, कृष्णा गोडसे, दिव्यांनशु देसाई, हेथी बाबरीया, मयंक ब्राह्मणकर यांनी चुरसुची लढत दिली.