राज्यामध्ये सर्वाधिक. ऊस गाळप म्हणून नावाजलेला करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखाना नाव लौकीक कमावलेला आहे. यामध्ये सर्वसामान्य कामगारांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे सर्वसामान्यत कामगारांचा सन्मान होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व संचालक मंडळाने एकमताने ठराव घेऊन एक मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगारांचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने कोंढार चिंचोली गावचे श्री मनोहर भाऊ लांडगे यांना उत्कृष्ट कामगार व प्रामाणिक पणे काम करण्यासाठी कारखान्याचे चेअरमन श्री दिग्विजय बागल यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी बाळासाहेब पांढरे, नंदकुमार भोसले , महादेव गुंजाळ, रामभाऊ हाके, दत्ता गायकवाड, हरिश्चंद्र खाटमोडे, लहू बनसोडे, श्री काकडे साहेब व सर्व कामगार वर्ग संचालक व अधिकारी वर्ग उपस्थित होते.