सलग १३२ वर्षे आपल्या कष्टमय योगदानातुन मुंबईच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांच्या कार्याचा लौकीक जगभर पसरला असतानाच त्या लौकिकात भर टाकणारा समाजसेवा क्षेत्रास समर्पीत मास्टर दिनानाथ मंगेशकर *आनंदमयी* पुरस्कार जग विख्यात मुंबई डबेवाल्यांच्या नुतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स चँरीटी ट्रस्ट ला प्राप्त झाला .
अनेक वर्षांच्या खडतर प्रवासात पिढी दर पिढी या व्यवसायातील आव्हानांना सामोरे जात आपल्या आगळ्या वेगळ्या नियोजन कौशल्यातुन ग्राहकांच्या सेवेखातर कष्टाला भांडवल बनवत जे कार्य डबेवाले कामगार आपल्या अभेद्य एकीतुन , सांघिक भावनेने , कामा प्रती निष्ठा बाळगत आपल्यातील सेवाभावी वृत्तीने करत आलेले आहेत यामुळे हे असामान्य कार्य लिलया पार पाडत जगभरातील व्यवस्थापन क्षेत्रातील मोठ मोठ्या व्यक्ती , संस्था , आस्थापनांच्या कौतुकाचे धनी ठरले आहेत .
आज हा पुरस्कार स्विकारताना ट्रस्ट चे अध्यक्ष मा. श्री उल्हासभाऊ मुके भावुक झालेले दिसुन आले . हा पुरस्कार मी मुंबई डबेवाले कामगारांना समर्पित करत आहे असे जाहिर करत या पुरस्काराचे खरे धनी हे आमचे कामगार आहेत अशी भावना व्यक्त केली .