मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 बीड

बीडच्या आतिश तोडकरला जुनियर नॅशनल स्पर्धेत सुवर्ण पदक

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   31-03-2022 19:55:12   569

 

पटना येथे चालू असलेल्या जुनियर नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला १ सुवर्ण व १ कास्य पदक 

जुनियर नॅशनल च्या तिसऱ्या दिवशी फ्री- स्टाईल गटात ५७ किलो सुवर्णपदक पटकावले , आतिश , जोग व्यायाम शाळा देवाची आळंदी येथे आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक प्रा. दिनेश गुंड यांच्या कडे सराव करतो तसेच रविराज चव्हाण याने कास्य पदक पटकावले , रविराज हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे अर्जुन वीर काका पवार यांच्या कडे सराव करतो . 

 या स्पर्धेसाठी परिषदेकडून प्रशिक्षक म्हणून रणजित महाडिक , संदीप पटारे व सोमनाथ फुलसुंदर यांनी जवाबदारी उत्तम पार पाडली . 

सर्व पदक विजेते कुस्तिगीर व त्याचे पालक आणि प्रशिक्षकांचे प्रा. बाळासाहेब लांडगे (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद )यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती