हेरिटेज डेअरी तर्फे शेतकरी मेळाव्याचे रुई येथे आयोजन.. अनिल पाटील
हादगाव तालुक्यातील रुई येथे हेरिटेज डेअरी चे चेअरमन अनिल पाटील यांच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्त असे की , शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून आपल्या शेतीसाठी एक धंदा म्हणून आजपर्यंत पाहिले जात होते. परंतु महाराष्ट्राचे हेड ऑफिसर श्री जगदाळे सर यांनी संबोधित करताना दुग्ध व्यवसाय हा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून उदयास येत असल्याचे सांगितले. कॉलिटी हेड निकम सर ,प्लांट मॅनेजर पटेल सर, एरिया मॅनेजर शिरसागर सर यांचीसुद्धा उपस्थिती होती.
रुई येथील दुग्ध व्यवसायिकांना आपल्या व्यवसायामध्ये सुधारणा करण्यात याव्या यासाठी रुई येथील डेअरी चे चेअरमन अनिल पाटील यांनी सदरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते केले होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रुई चे सरपंच अमोल पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. या कार्यक्रमास गावातील मोठ्या संख्येने दूध उत्पादक वर्ग उपस्थित होता.