आज फळी येथील शेतकरी सकाळी 8 वाजल्यापासून हदगाव येथील पशु वैधकिय दवाखान्यात आले असता डॉ. खंदारे साहेब 12 वाजेपर्यंत आलेच नाही त्यामुळे आज शेतकऱ्यांची शेळी हि उपचारावीणा दगावली असल्याची माहिती शेतकरी बांधवांनी आम्हाला फोन करून दिली आज मनसे टीम पशु वैधकिय दवाखान्यात हजर होऊन पशु वैधकिय अधिकारी डॉ खंदारे यांची फोनवरून माहिती घेतली असता आज मुलाची परीक्षा असल्याचे सांगितले कुठल्याच प्रकारची सुट्टी न घेता गैरहजर राहिल्या मुळे आज शेतकऱ्यांचे 10ते 15हजार रुपयाचे नुकसान झाले आहे .तिथे इतर शेतकरी आपले पशु घेऊन आले त्यांनी सुध्दा सांगितले डॉ .साहेब आम्हाला कधीच भेटत नाहीत .
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे कामचुकार अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येत नाही आणी कायमस्वरूपी डॉ .भेटत नाही तो पर्यंत मनसे शांत बसणार नाही .असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष :-बालाजी पाटील कऱ्हाळे यांच्या वतीने देण्यात आला.