उमरखेड: युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल ७ मार्च रोजी जाहीर झाला असुन युवक काँग्रेस उमरखेड-महागाव विधानसभा अध्यक्षपदा करीता माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचे चिरंजीव युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विधीतज्ञ कवी युवराज पाटील देवसरकर यांना सर्वाधिक तब्बल ६०२३ इतकी मते मिळाली असून मोठ्या फरकाने युवराज पाटील देवसरकर यांनी विजय संपादन केला आहे.
विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील अध्यक्ष पदाकरिता त्यांनी सर्वाधिक मताधिक्य घेत अग्रस्थान मिळविले आहे. तर इमरान पठान यांना ३८५२ इतकी मते मिळाली असुन त्यांनी युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्षपदी स्थान मिळविले आहे.
युवराज पाटील देवसरकर यांनी आपल्या विजयाचे श्रेय काँग्रेस, युवक काँग्रेसच्या सर्व नेते मंडळींना लोकप्रतिनिधींना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना व मित्रमंडळींना दिले आहे.