मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 सोलापूर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढार चिंचोली येथे मोठ्या जल्लोषात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   09-03-2022 03:30:54   613

ता.करमाळा कोंढार चिंचोली:  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढार चिंचोली येथे मोठ्या जल्लोषात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला . गावच्या सरपंच माननीय सौ. नीलिमा ताई गलांडे ,शाळा व्यवस्थापन अध्यक्षा कविताताई साळुंखे, ग्रामपंचायत सदस्या  कुसुमताई धांडे, डॉक्टर उज्ज्वला पाटील व आशा ताई मनीषा कांबळे यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ ,अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .

         पंचायत समिती सदस्या सौ .मंदाकिनी ताई लकडे, कात्रज च्या उपसरपंच सौ. रेश्मा लकडे यांनी कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या .शाळेची माजी विद्यार्थिनी पूजा शिंदे हिची पोलीस दलात निवड झाल्याने शाळेच्या वतीने तिचे अभिनंदन करून तिचा व तिच्या कुटुंबियांचा यथोचित सन्मान करण्यात आला .तसेच आदर्श माता सौ .राहीबाई गोविंद लांडगे यांचाही सन्मान करण्यात आला .

       शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कविताताई साळुंखे व सीमा गलांडे यांनी अभंग व गीते सादर केली .गावच्या आशाताई मनीषा कांबळे यांनी आरोग्यविषयक ओव्या व गाणी सादर केली .तसेच शाळेतील शिक्षक श्री ईवरे सर यांनी माता पालकांना मार्गदर्शन केले व शाळेचा प्रगतीचा आढावा महिलांसमोर सादर केला .शाळेतील शिक्षिका निकम मॅडम यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले तसेच श्रीमती अनिता बारवकर यांनी महिलांना मार्गदर्शन आपल्या मनोगतातून केले.

             इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी कांचन तावरे व नेहा शिंदे यांनी जन्म बाईचा हे गीत सादर केले .सत्कारमूर्ती पूजा शिंदे हिने आपले मनोगत व्यक्त करून आपण या शाळेची विद्यार्थिनी असल्याचा अभिमान व्यक्त केला. 

              महिलांसाठी संगीत खुर्ची ,रिंग म्युझिक डान्स ,बिस्कीट खाणे अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या .उपस्थित महिलांना गावचे सरपंच नीलिमा ताई गलांडे व शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संजय आप्पा साळुंखे यांनी स्नेहभोजन दिले .उपस्थित महिलांनी सायन्स वॉल तसेच मिसाईल ची पाहणी केली .स्पर्धेनंतर हळदी-कुंकवाचा कार्यक्रम झाला. प्रत्येक विजेत्या महिलेस बक्षीस व उपस्थित महिलेस अनमोल अशी भेट देण्यात आली .ग्रामीण उखाणे कार्यक्रमात अतिशय रंगत आली

             हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक हिराकांत शिंदे ,श्री महारूद्र पाटील, श्री तानाजी पवळ सर, श्री ठोंबरे सर ,श्री विठ्ठल इवरे सर, श्री दादा चव्हाण सर ,श्रीमती शोभा निकम मॅडम श्रीमती अनिता बारवकर मॅडम यांनी परिश्रम घेतले.🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌳🌳🌳🌴🌴🌴


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती