मुंबई डबेवाल्यांचा 130 वर्षाचा गौरवशाली इतिहास व व्यवस्थापनामुळे जगभरातील नावलौकिक मिळाल्यामुळे जगभरातून अनेक पर्यटक व महाविद्यालयीन विद्यार्थी डबेवाला यांचे व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी मुंबईमध्ये डबेवाल्यांना भेटण्यासाठी येत असतात. अशा पर्यटकांना व विद्यार्थ्यांना व्यवस्थापनेचे धडे शिकविण्यासाठी व डबेवाला कामगारांच्या कल्याणासाठी डबेवाल्यांच्या सन्मानार्थ मुंबई महापालिकेच्या माध्यमातून वांद्रे पश्चिम मुंबई येथे मुंबई डबेवाला भवन मंजूर केले आहे.
या वास्तूचे उद्घाटन आज रविवार दि.06/03/2022 रोजी सकाळी 11:30 वाजता माननीय पर्यावरण मंत्री आदित्यची उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी आपण या सोहळ्यास उपस्थित रहावे अशी विनंती नुतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरीटी ट्रस्टने केली.