मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 पुणे शहर

नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींनी दिला STOP WAR संदेश

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   04-03-2022 22:12:30   8311

धायरी येथील धायरेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संचलित नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल येथील जवळ पास ६०० विद्यार्थीनी मिळून STOP WAR असा स्पेलिंग बणवून.सध्या चालू असलेल्या रशिया व युक्रेन युद्धामुळे आत्तापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. हा युद्धाचा वणवा आणखी वाढला तर येणाऱ्या काळात संपूर्ण जगालाच त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. याच पार्श्वभूमीवर आमच्या धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संचलित नालंदा इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'STOP WAR' असा संदेश दिला. 

युद्ध हा पर्याय नसून मानवतेला विनाशाकडे घेऊन जाणारी वाट आहे, त्यामुळेच लवकरात लवकर हे युद्ध थांबेल व तिथे अडकलेले सर्व भारतीय नागरिक सुखरूप मायदेशी पोहचावेत अशी प्रार्थना यावेळी केली.संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.काकासाहेब चव्हाण यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की, अगोदर २ वर्षापासून करोना या महामारीतून जग सावरत असतानाच .युध्द नको शांतता पाहिजे असा संदेश दिला. हा कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष    श्री काकासाहेब चव्हाण यांनी यांची संकल्पना प्राचार्य डॉक्टर सौ सुनिता सतीश  चव्हाण यांनी प्रत्यक्षात साकारण्यासाठी शाळेचे शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी उत्कृष्ट काम केले.  


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती