मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 पालघर

क्रांतिसूर्य बिरसामुंडा स्मारकाचे अनावरण

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   02-03-2022 15:22:13   508

 

 

           26 जानेवारी 2022 रोजी प्रशासन पालघर यांच्या सोबत बोलणी झाल्या प्रमाणे 26 जानेवारी 2022 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत  एक महिनाभरात(30दिवस)  प्रशासन पुतळ्याचे अनावरण करणार होते.  परंतु बिरसा मुंडा स्मारकावरील कपडा उतरवलेला नाही . म्हणून 1 मार्च 2022 रोजी सर्व आदिवासी समाज  आणि स्थानिक बिरसा मुंडा स्मारक कमिटि यांनी पुढाकार घेवून क्रांतिसूर्य बिरसामुंडा स्मारकाचे अनावरण करण्यात आले.  आदिवासी समाज  बांधवाणी हर्षोउल्लास करीत "बिरसा मुंडा करे पुकार उलगुलान, उलगुलान!!", जब तक सूरज चांद रहेगा,बिरसा तेरा नाम रहेगा, ! अबुआ दिशोम ,अबुआ राज! हमारे गांव में हमारा राज!, आमच्या गावात ,आमचे सरकार ! जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर धरती गीत घेवून बिरसा मुंडाना मानवंदना दिली. 

           महिला आणि स्थानीक कमिटी चे, विष्णु जाधव,रूपेश धापशी,उत्तम रावते, पिंटू बसवत, संजय मुदेकर, जयेश मोरे, आदिवासी एकता परिषदेचे, राजू पांढरा, डॉ. सुनिल प-हाड़ ,किर्ती वरठा,मुंबई हुन सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भोईर, आणि त्यांचे सहकारी, ठाणे येथून आदिवासी एकता परिषदेचे दीपक भाऊ फुफाणे  आदी कार्यकर्त्यांनी बिरसा मुंडाच्या स्मारकाची पूजा करून मानवंदना दिली.

           तसेच या पूजन कार्यक्रमानंतर आदिवासी समाजाने आनंद उत्साह साजरा करत आदिवासीच्या पारंपरिक तारपा नाच करत आनंद साजरा केला.

           अशा पद्धतीने बहु प्रतीकक्षेतील क्रांतिसूर्य बिरसा मुंडाचे स्मारक ग्रामसभा आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आदिवासी समाजाच्या वतीने अनावरण करण्यात आले. त्याबद्दल पंचक्रोशीतील लोकांनी समाधान व्यक्त केले.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती