मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 ठाणे

शहापूरात भरतेय विठ्ठलनामाची शाळा

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   27-02-2022 17:18:58   416

          ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे मागील काही दिवसांपासून एका अभिनव उपक्रमाची सुरवात झाली आहे.

           येथील हभप शरद महाराज बिन्नर यांच्या पुढाकाराने परिसरातील जवळपास शंभर पेक्षा अधिक लहान मुले एकत्र येऊन नियमित हरिपाठ म्हणतात, त्यात रंगून जातात.

        एका बाजूला लहान मुलं, तरुण पिढी मोबाईल आणि व्यसनाच्या आहारी जात असताना  शंभर पेक्षा जास्त मुलं नियमित एकत्र येऊन हरिपाठ म्हणतात ही गोष्ट नवलाची आहे.

       दरम्यान, स्वतः पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू करणारे हभप शरद महाराज बिन्नर यांचं संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती