राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या मान्यतेने श्री. राजेश्वर चव्हाण यांची बीड जिल्ह्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते राजेश्वर माने यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले. बीड जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी राजेश्वर चव्हाण यांचे सहकार्य राहील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, अशोक अबाडक उपस्थित होते.