ता. उमरखेड: नादुरुस्त विद्युत रोहित्र तात्काळ दुरुस्त करा.गेल्या आठवड्या पासून उमरखेड ढाणकी रस्त्यावरील गुरांच्या बाजारा जवळील विद्युत रोहित्र नादुरुस्त अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील हाती आलेली पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत याबाबत अनेक शेतकऱ्यांनी उमरखेड च्या वीज वितरण कार्यालयाला नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून द्यावे याबाबत कळविले होते परंतु उमरखेड महावितरणच्या कार्यालयाकडून येथील विद्युत रोहित्र दुरुस्त करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने येथील शेतकऱ्यांनी ही बाब माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या कानावर टाकली अखेरीस उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी गादी सोबत घेऊन उमरखेडचे महावितरण कार्यालय गाठत नादुरुस्त विद्युत रोहित्र तात्काळ दुरुस्त करा यासाठी कार्यालयातच ठिय्या मांडला.
तसेच ग्रामीण भागातील इतरही काही शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत रोहित्र गेल्या काही महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत आहेत तेसुद्धा तात्काळ दुरुस्त करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी माजी आमदार देवसरकर यांनी केली आहे.