‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूंशी!’ या संवाद यात्रेच्या पाचव्या टप्प्यातील आढावा बैठक "पंढरपूर" येथे आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारिणी आढावा बैठक घेण्यात आली. तेथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
सत्तेत असताना लोकांची कामे व्हावी, संघटना वाढावी त्याच बरोबर कार्यकर्ते पक्षाशी जोडावे हा विचार ठेवून परिवार संवाद चालू केली. या परिवार संवाद यात्रेला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा जोश पाहता आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच बहुमत असेल असा विश्वास वाटतो.
यावेळी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. दत्तामामा भरणे,मा आमदार दीपकआबा साळुंखे,रुपालीताई चाकणकर अध्यक्षा राज्य महिला आयोग, निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील,फ्रंटल सेल चे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्षा जयमाला गायकवाड, निरीक्षक दिपाली पांढरे, जिल्हाध्यक्षा ॲड. सुप्रिया गुंड, कार्याध्यक्षा रंजना हजारे तसेच पदाधिकारी उपस्थित होते