मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 धायरी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आधार सोशल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने धायरीत आगळा- वेगळा शिवजन्मोस्तव साजरा होणार

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   17-02-2022 14:31:02   686

         छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे  १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.

          छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले.

        शनिवार दि. १९.०२.२२   रोजी महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहाने "शिवजन्मोस्तव” साजरा  करण्यात येणार आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील धायरी येथे प्रथमच १००० दीप प्रज्वलित करून हा “शिवजन्मोस्तव”  आगळा-वेगळा व अभिनव पद्धतीने  साजरा करण्यात येणार आहे.        

                      राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व आधार सोशल ट्रस्ट यांच्या संयुक्त  विद्यमाने हा शिवजन्मोस्तव साजरा करण्यात येणार आहे.

       स्थळ :- ब्रम्हगिरी आर्केड, गारमाळ, धायरी पुणे ४११०४१. 

       • दिनांक :- १९ फेब्रुवारी २०२२  रोजी

       • वेळ :- सायंकाळी ७ .०० वा


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती