आगामी पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. निवडणुकीच्या प्राथमिक तयारीसाठी प्रभाग क्र. ५४ मधील शिवसैनिकांचा पहिला मेळावा आपल्या धायरी येथे शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष श्री.रमेशबाप्पू कोंडे, महिला संघटिका आघाडी सौ.पुजाताई रावेतकर, युवासेना जिल्हाध्यक्ष श्री.सचिन पासलकर, खडकवासला मतदार संघ अध्यक्ष श्री.नितिनदादा वाघ, श्री.पंढरीनाथ पोकळे, श्री.सुरेश गायकवाड, श्री.निलेश गिरमे, श्री. दत्तानाना रायकर, श्री.राजाभाऊ पायगुडे, श्री.महेश विटे, श्री.संजय पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या बैठकीस धायरी, नऱ्हे, आंबेगाव येथील जवळपास २५० कार्यकर्ते उपस्थित होतो. यावेळी आपल्या धायरी आंबेगाव प्रभाग क्रमांक ५४ वरती चर्चा करण्यात आली. सदर बैठकीत आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी व पक्षाची ध्येयधोरणे याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच स्नेहभोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला, यावेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महिला आघाडी उपस्थित होत्या.