मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 अहमदनगर

शिवजयंतीला विठाई फाऊंडेशनच्या वतीने भव्य चॅरिटेबल हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा

योगेश नागरे ( मुंबई प्रतिनिधी )   13-02-2022 01:28:13   513

                 अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील समशेरपुर येथे येत्या शिवजयंतीला म्हणजेच 19 फेब्रुवारीला विठाई फाऊंडेशनच्या वतीने भव्य चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू होणार आहे.

                 समशेरपुर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप दराडे यांच्या प्रयत्नातून विठाई चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू होत आहे.
 मागील वर्षी आलेल्या कोविड च्या लाटेने केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला ,हीच गोष्ट लक्षात घेऊन श्री संदीप दराडे यांनी विठाई चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने  हॉस्पिटल सुरू करण्याचे ठरवले.

                 सदर हॉस्पिटलमध्ये एक्स रे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, ऑक्सिजन, ऑपरेशन आदी सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहे. या हॉस्पिटल मुळे परिसरातील लोकांना सहज उपचार मिळण्यास मदत होणार आहे.ट्रस्टच्या वतीने 19 तारखेला उदघाटनासाठी लोकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती