पंढरपूर- तालुक्यातील गोपाळपूर ते ओझेवाडी व रांझणी-शिरगांव-तरटगांव या रस्त्याचे काम करण्याचे आदेश देऊन देखील ठेकेदार हे काम सुरू करीत नसल्याने या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे या मागणी साठी भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या वतीने त्या भागातील सर्व शेतकरी व नागरीकांनसोबत गोपाळपूर चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी आमदार प्रशांत मालक,दिनकारभाऊ मोरे, वसंतनाना देशमुख, सौ.राजश्रीताई भोसले, प्रशांत देशमुख, सोमनाथ आवताडे, लक्ष्मण धनवडे,सुभाष मस्के,कैलास खुळे,भास्कर कसगावडे,सुनिल भोसले,रोहीत पानकर,विक्रम शिरसट,बादलसिंह ठाकूर,सुदाम मोरे,दत्ता ताड,दिपक भोसले,शिवाजी आसबे,आदी नागरिक,शेतकरी,विविध गांवातील सरपंच,पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.