मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 यवतमाळ

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

तेजस तुपेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी)   01-02-2022 08:55:21   478

उमरखेड-   घरकुल चा तिसरा हप्ता मंजूर करण्यासाठी एक हजार रुपयाची स्वीकारली लाच.

           उमरखेड तालुक्यातील जेवली या गांवातील घरकुल योजना मधील तिसरा हप्ता देयक करण्यासाठी लाभार्थ्यांकडून एक हजार रुपयांची लाच मागून आज प्रत्यक्ष स्वीकारल्या प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ग्रामसेवक अडकल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

           सविस्तर वृत्त असे की, जेवली येथील लाभार्थ्याचे घरकुलाचे स्वप्न साकार झाले पण घरकुलाचा देय असलेला तिसरा हप्ता बँकेत जमा करण्यासाठी लाभार्थ्यांकडून एक हजार रुपयांची लाच मागितली.  पात्र लाभार्थी यांचे कडुन पंचायत समिती मधील प्रधान मंत्री ग्रामीण आवास योजना , ग्रामीण गृहनिर्माण कक्ष ह्या ठिकाणी 31  जानेवारी सायंकाळी 5:00 च्या दरम्याण 1000/- हजार रुपयाची लाच घेताना  जेवलीचे ग्रामसेवक संजय पाडाळकर यांना यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक पथकांने सापळा रचून  पकडले.  

        वृत्त लिहीपर्यंत एसीबी पथकाची कार्यवाही विश्रामगृहावर सुरू होती.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती