मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 अकोला

विठाई फाउंडेशनने घेतला सर्वसुविधायुक्त हॉस्पिटल उभारणी करण्याचा निर्णय

योगेश नागरे ( मुंबई शहर प्रतिनिधी )   28-01-2022 23:19:37   456

                   तालुक्यातील नागरिकांना अल्पदरात उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने विठाई फाउंडेशनने सर्वसुविधायुक्त हॉस्पिटल उभारणी करण्याचा निर्णय घेतला व येणाऱ्या १९ फेब्रुवारीला गडवाट परिवार आयोजित आरोग्यवर्धक शिवजयंती साजरी करून सर्व पदाधिकारी रुग्णसेवेत रुजू होणार आहेत असे सांगण्यात आले .

                    म्हणून रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी अकोले तालुक्याचे आमदार मा.डॉ.किरण लहामटे साहेब यांनी भेट दिली, कामाची पाहणी करून अतिशय समाधान व्यक्त करत १ लाख रुपयांचा धनादेश विठाई फाउंडेशनला सुपूर्द केला.

                   खरंतर आमच्या टीमसाठी ही शाब्बासकीची थाप आहे, याने नक्कीच चांगलं कार्य करण्यासाठी आम्हाला आणखी ऊर्जा प्राप्त होईल असे उद्गार विठाई फाउंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी काढले व  आमदार डॉ.लहामटे साहेबांचे आभारही मानण्यात आले .


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती