निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही". निकालानंतर माझा बाप आठवल्या शिवाय राहणार नाही, रोहित पाटील यांनी जे बोलले होते, ते करुन दाखवल्याचं चित्र सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं.
कवठेमहांकाळ नगरपंचात निकाल - 2022
- रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी पॅनेल 10
- शेतकरी विकास पॅनल 6 जागी विजयी
- 1 अपक्ष विजयी
रोहित पाटील प्रचारावेळी काय म्हणाले होते?
कवठेमहांकाळ नगरपंचायतीचा निकाल येत्या 19 तारखेला येईल. माझा बाप काढणाऱ्यांनो तुम्हाला निकालावेळी माझ्या बापाची आठवण नक्की होईल. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला सल्ले देणाऱ्यांनो तुम्ही काय कामं केली ते सांगा.